पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी " रोल ऑफ डेटा स्ट्रक्चर इन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग" या विषयावर सार्थक व्होरा यांचे व्याख्यान संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
व्याख्यानाचे प्रमुख वक्ते सार्थक व्होरा यांचे विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सार्थक व्होरा यांनी दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना डेटा संरचनांचा योग्य वापर केल्यास, आपल्याला समस्यांचे समाधान जलद आणि अधिक कार्यक्षमतेने मिळवता येते. आधुनिक संगणक विज्ञान आणि सॉफ्टवेअर विकासामध्ये डेटा संरचनांचा महत्वाचा सहभाग आहे. यामध्ये लिंक्ड लिस्ट, स्टॅक, क्यू यासारख्या डेटा संरचनांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना समजावण्यात आले की, योग्य डेटा संरचनांचा वापर न केल्यास, सॉफ्टवेअर प्रणाली मंदावू शकतात.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अल्ताफ मुलाणी, प्रा. सोनाली गोडसे, प्रा. स्वप्निल टाकळे आदींसह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.