मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज सुभाष
जॉय ऑफ गिविंग आणि आयआयकेअर या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई येथील आदिवासी शाळांतील मुलांना संगणकाचे शिक्षक मिळावे या उद्देशाने जॉय चे नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील यांच्या पुढाकाराने संगणक वाटप (भेट) देण्याचे अभियान सुरू असून आतापर्यंत जवळपास पंधरा संगणक वाटप करण्यात आले आहेत.
ज्या शाळांना संगणक मिळाले तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी जॉय संस्थापक गणेश हिरवे, आयआयकेअर संचालक संतोष भोसले यांचे आभार मानले असून आजही खेड्यापाड्यातील विद्यार्थी अनेक भौतिक आणि शैक्षणिक सुख सुविधेपासून वंचित असल्याचे त्यांना देखील शहरी भागातील मुलांसारख्या सोयी सुविधा मिळायला हव्यात असे मत पाटील यांनी भाषणातून व्यक्त केले.