पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अनुलोम परिवारातर्फे पंढरी नगरीत 501 जोडप्यांच्या हस्ते प्रयागराज तीर्थ कलश दर्शन व पूजन सोहळा श्री संत नामदेव पायरी ते महाद्वार येथे आयोजित करण्यात आला
यावेळी सुमारे 501 जोडपी आणि किमान 1000 भाविक भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होती,शिवाय हजारो भाविकांनी महाकुंभ जलाचे दर्शन घेतले.
सर्व प्रथम सचिन लादे यांनी सर्व जोडप्यांना आवश्यक त्या सूचना देत सूत्रसंचालन ची यशविरीत्या जबाबदारी पार पाडली,त्यानंतर अनुलोम चे c e o स्वानंद जी ओक यांनी हिंदू धर्म,महाकुंभ मेळा,आपली संस्कृती यावर सुंदर असे मार्गदर्शन केले,
त्यानंतर तुकाराम खंदाडे यांनी सपत्नीक प्रातिनिधिक स्वरूपात कलशाचे पूजन केले, ओंकार वैद्य आणि ओंकार कापसे यांनी अतिशय चांगले पौरोहित्य केले,मंत्रोउच्चारात कलश पूजन झाले,त्यानंतर श्री विठ्ठलाची आणि गंगेची आरती झाली,मंत्र पुष्पांजली घेऊन प्रसाद वाटप करण्यात आला.
सदर कार्यक्रमास मा. आमदार प्रशांत परिचारक ,आमदार समाधान आवताडे, अनुलोम चे विभाग प्रमुख शरद साळुंखे,उपविभाग प्रमुख पांडुरंग जी शिंदे ,भाग प्रमुख रामेश्वर कोरे, नगरसेवक,प्रतिष्ठित नागरिक , स्वेरि कॉलेज आणि सिंहगड कॉलेज चे शिक्षक मंडळी आणि असंख्य एन. एस. एस. चे शेकडो विद्यार्थी ,अनुलोम चे अनुलोम मित्र,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते,विश्व हिंदू परिषद,शिव प्रतिष्ठान,बजरंग दलाचे स्वयंसेवक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.