पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
माघवारी पालखी सोहळा परंपरेने माघ शुद्ध दशमीला पायी चालत पंढरीमध्ये प्रवेश करत असताना रिंगण करण्याची प्रथा आहे.रिंगण सोहळा हा वारकरी संप्रदायातील खूप महत्वपूर्ण आहे. त्याप्रमाणे वारकरी भाविक पाऊल खेळत " ज्ञानोबा तुकाराम " गजर करत उत्साहमध्ये उड्या मारत भक्तीमय वातावरण मध्ये निघाला. दि. 07-02-2025 रोजी स. 10.00 वा. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखीचे पूजन ह भ प भागवत चवरे महाराज (राष्ट्रीय उपाध्यक्ष ) यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
तदनंतर जलाराम महाराज मठ, (पंढरपूर) समोर रिंगण लाऊन घेतले आणि " माऊली माऊली "
गजर घुमू लागला. सर्व वातावरण चैतन्यमय बनले होते.
" पुंडलिक वर दे हरी विठ्ठल "
गजर झाला आणि अश्व धावू लागले. उभे रिंगण पूर्ण झाले आणि पालखी सोहळा मार्गस्थ झाला . सुधाकर इंगळे महाराज यांचे मार्गदर्शनाने व जोतिराम चांगभले ( प्रदेश अध्यक्ष ), संजय पवार (शहर अध्यक्ष ), किरण श्रीचिप्पा ( सह अध्यक्ष ), निवृत्ती मोरे , तानाजी बेलेराव महाराज, यांच्या प्रमुख उपस्तीथी मध्ये संपन्न झाला . राकेश अन्नम,शंकर भोसले, कुमार गायकवाड,इ पदाधिकारीनी परिश्रम घेतले.