सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
संग्राम काटे हा एका गरीब सर्वसाधारण कुटुंबातला एका मजुरी करणाऱ्या गवंड्याचा मुलगा असून, त्याने एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली त्या चित्रपटाचं नाव आहे "उगराट" हा चित्रपट अनेक अडचणीतून पार पडलेला आहे.
त्यामध्ये आर्थिक व मानसिक अशा बऱ्याच अडचणीला "संग्राम काटे" याला व त्याच्या संपूर्ण टीमला सामोर जावं लागलं हा चित्रपट करत असताना बऱ्याच वेळा खूप सार्या अडचणी आल्या . संग्रामला लहानपणापासूनच कलाक्षेत्रामध्ये काम करण्याचे खूप आवड होती आणि ती आवड आपल्या परिस्थितीमुळे त्याला जोपासता येत नव्हती.
त्यामुळे त्याने काम करत करत आपली कला जोपासायच ठरवलं आणि त्यासाठी त्याने आपले घर आणि आपले गाव सोडून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईमध्ये जाऊन त्याने मिळेल ते काम करून व ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी झोपला आपली कला जोपासायला सुरुवात केली सात ते आठ वर्ष मुंबईमध्ये काढल्यानंतर त्यांनी शेवटी गावी जाऊन चित्रपट निर्मिती करायची असं ठरवलं पण त्यासाठी लागणारा होता तो खूप मोठा पैसा आणि तो पैसा आणायचा कुठून ही खूप मोठी अडचण संग्रामच्या पुढे होती पण मजुरी करणाऱ्या वडिलांची परिस्थिती खूप गरीबीची व झालाकीची होती. पण संग्रामची जिद्द पाहून त्याच्या वडिलांनी "भीमराव काटे "यांनी त्यांच्या पूर्वजांची अर्धा एकर जमीन होती तीही संग्रामच्या स्वप्नांसाठी विकून व घरातील जे पण सेविंग होते ते सर्व पणाला लावून घरातील सोने नाणे जे होते ते सर्व विकून संग्रामच्या स्वप्नांसाठी लावले . आणि त्यातून "उगराट" या चित्रपटाची निर्मिती झाली.
उगराट या चित्रपटामध्ये संग्रामने गावाकडचे कलाकार मुंबई सारख्या सिटीमध्ये जाऊन ऑडिशन देऊन मरमर करून ही त्यांना का मिळत नाही अशा कलाकारांना सोबत घेऊन एक नवीन टीम बनवली व अशा दमदार टीम सोबत "उगराट" चित्रपटाची निर्मिती झाली. पण चित्रपटाच्या शेवटच्या क्षणाला घरातले सर्व पैसे व विकता येणार्या अशा सर्व वस्तू विकून पण चित्रपटाला पैशाची कमी भासत होती अशावेळी को, जुनोनी, तिपेहाळी या भागातील लोकांनी संग्रामला लोकवर्गणी काढून या चित्रपटासाठी पैसे दिले व हा चित्रपट पूर्ण करण्यास मदत केली आणि येत्या 9 फेब्रुवारी 2025 रोजी या "एस के फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत "उगराट " चित्रपटाचा पहिला टीचर व पोस्टर प्रदर्शन सोहळा सांगोला या ठिकाणी पार पडणार आहे.
त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या क्षेत्रातून बरेच लोक या चित्रपटाला व या चित्रपटाच्या पहिल्या टीजर आणि पोस्टरला भरभरून शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे की एका सर्वसामान्य मुलाने व त्याच्या टीमने बनवलेला हा "उगराट" नावाचा चित्रपट
PRODUCER - SANGRAM BHEEMRAV KATE ASSIS DIRECTOR - ONKAR KAKADE
STORY DIALOGUE & SCREENPLAY - SANGRAM KATE
ASSOCIATE DIRECTOR - KAPILKUMAR BHALSHANKAR
ART DIRECTOR - ABHISHEK JAVIR
D.O.P. - ROSHAN YEDKE & PRAFUL 4K &
SAGAR KENGAR
EDITOR - ATMARAM MATE
COLOUR ,D.I. & FOLLY - OM SOHAM STUDIO
MUSIC & DUBBING - MEHBOOB RECORDING STUDIO SOLAPUR
LYRICIST - KAPIL BHALSHANKAR , SIDDHNATH GAIKWAD, RAVI KATE,
ONKAR KAKADE
MAKEUP - KRISHNA PAWAR & SNEHAL REBELLO
LIGHT DEPARTMENT - ROCKY GAIKWAD , NANASAHEB JADHAV , KARAN MOHITE