पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निम्मित याही वर्षी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहर पातळीवर भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धा सलग १३ वर्षापासून आयोजित करण्यात आली होती. सदर चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत , मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले व समाजसेवक किरण आप्पा भोसले यांच्या उपस्थित करण्यात आले.
सदर या स्पर्धेसाठी १५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. इयत्ता १ ली ,२ री व इयत्ता ३ री,४ थी या गटात रंगभरण आणि इयत्ता ५ ते ७ यामध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शिक्षक आमदार यांनी बाल मित्रांशी संवाद साधून त्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही सर्वात मोठी स्पर्धा आहे असे उद्गार काढले. यावेळी बहुसंख्य पालक , माता भगिनी उपस्थित होते हा.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशिनाथ गोगाव , चंद्रकांत देसाई , सतीश चंद्रावर , राजकुमार ढवळे , आशपाक मुजावर , सुहास मासाळ , महेश भोसले व मंडळातील सर्व सभासद.