गादेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
जोतिर्लिंग बहुउद्देशीय सामाजसेवी संस्था गादेगाव यांच्या वतीने फाटे ट्रॅक्टर शोरूम कोर्टी येथे शिवजयंती जोमाने साजरी करण्यात आली.
यावेळी महाराजांच्या मूर्तीचे पूजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष - शरद पवार जिल्हा कार्याध्यक्ष गुलाबभाई मुलाणी याच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित श्री. संजय पवार, डॉ. रमेश फाटे , डॉ.माणिक मस्के , शशांक फाटे, महेश भानवसे, रोटोकिंग कंपनीचे मॅनेजर सुमिल दमाने, बापू बागल, अभिमन्यू पवार, विनय शिंदे, निवृत्ती पाटील , संतोष पुणेकर, ओंकार कथले मोहित कुमार, सुरज मोरे, विशाल धंडोरे , वल्लभ बनकर, वल्लभ शिंदे, योगेश सकटे, प्रतीक लिंगे , समाधान बागल , ऋषिकेश बागल, आदमीले मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते.