सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स डिस्ट्रिक्ट 3234 डी, 1 रिजन 1.रिजन कॉन्फरन्स मध्ये लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीचे सन्माननीय सदस्य लायन नंदिनी मुकुंद जाधव बेस्ट झोन चेअरमन पुरस्कार , तसेच जेष्ठ लायन सदस्य सोमशेखर जगदेवी ईरप्पा भोगडे यांना बेस्ट सचिव म्हणून पुरस्कार मिळाले आहे.
लायन सोमशेखर भोगडे हे लायनीझम २७ वर्ष कार्यकाळात माजी अध्यक्ष, कॅबिनेट इतरही पोस्ट वर कार्यरत होते. त्यांना आजतागायत लायन्स इंन्टरनॅशनल कडून बेस्ट अध्यक्ष कॅबिनेट म्हणून वेगळा ठसा उमटवला आहे आजपर्यंतच्या लायन्स क्लबच्या सेवेबद्दल लायन्स क्लब सोलापूर व्टीन सिटी नुसते शहरा पुरते काम न करता ग्रामीण भागात वाड्या वस्तीवर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, असे विविध सेवाकायाऺत अग्रेसर आहे.या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.