पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
माघवारी निमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील जाणाऱ्या सर्व दिंडीचे माध्यमातून अखिल भाविक वारकरी मंडळ यांनी प्रस्थान व रिंगण सोहळा सुरु केला आहे . " चला पंढरीसी जाऊ | रखुमा देवी वर पाहू || "
या न्यायाने वारकरी पंढरपूर ला पायी चालत जातात.
माघ शुद्ध षष्टीला दि. 03-02-2025 रोजी श्री मार्कंडेय मंदिर, पंचकट्टा सोलापूर येथे दु. 4.00 वा. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी पूजन नागनाथ शिंदे महाराज , महेश जाधव महाराज, मल्लिनाथ गट्टे यांचे हस्ते करण्यात आले . वारकरी प्रथे प्रमाणे नित्य नियमाचे अभंग व भजन करून त्यावेळी जे उपस्थित सर्व दिंडीतील विणेकरी महाराज व पदाधिकारी यांचा श्री सुरेश फलमारी पद्मशाली ज्ञाती संस्था, सोलापूर यांचे कडून दरवर्षी प्रमाणे सन्मान करण्यात आला . हा पालखी सोहळा " ज्ञानोबा तुकाराम " भजनाच्या गजरामध्ये नॉर्थकोट प्रशाला मैदान, सोलापूर येथे पोहोचल्या नंतर मान्यवर व श्री उमाकांत मिटकर , श्री दत्ता अण्णा सुरवसे, प्रदीप मोरे महाराज यांचे हस्ते अश्व पूजन केले तसेच अश्व चोपदार तुकाराम कोळी यांचा ही सत्कार करण्यात आला व मान्यवरांचा सन्मान केला.
तदनंतर महिला व पुरुष वारकरी भाविकांनी उत्साह मध्ये पाऊल , फुगडी खेळ केले व नंतर गोल रिंगण लाऊन घेतले . पहिले रिंगण ध्वजाधारी भाविकांचे झाले कारण दिंडीची सुरुवात पताका ने होते . तुळशी वृंदावनधारी महिला व मृदंगाचे रिंगण झाल्या नंतर विणेकरी रिंगण केले. शेवटी अश्व रिंगण करण्यासाठी कर्नाटक अंकली येथून आषाढी वारीतील माऊलींचे अश्व आले होते . अश्व रिंगण सुरु झाले आणि भाविकांचे मध्ये चैतन्य संचरले. सर्व वातावरण हे पंढरीमय झाले होते. सोलापूरकरांना वारीतील आनंद या माध्यमातून घेता आला.
हा सोहळा श्री महादेव मंदिर साठे चाळ, सोलापूर येथे पोहोचला व नंतर आनंद चंदनशिवे , विजय चोरमुले यांच्या हस्ते आरती करून समारोप केला. या मध्ये शहरातील 38 व परिसरातील 25 दिंडी सहभागी झाल्या होत्या .
हा सोहळा पाहण्यासाठी शहरातील व परिसरातील हजारो महिला व पुरुष भाविक उपस्थित होते .तसेच सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला असून या सर्व कार्यक्रमासाठी जोतिराम चांगभले (प्रदेशअध्यक्ष ), बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष ), मोहन शेळके (प्रदेश सचिव ) , बंडोपंत कुलकर्णी (जिल्हा अध्यक्ष ), संजय पवार (शहरअध्यक्ष ), सचिन गायकवाड ( उपाध्यक्ष ) व सर्व पदाधिकारीनी परिश्रम घेतले.