पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहरापासून जवळ असलेल्या करकंब या गावाजवळ मुख्य रस्त्या लगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलिप बापू धोत्रे यानी होटल ग्रँड नामक पंच तारांकिताप्रमाणे होटल ची उभारणी केली असून या होटल ग्रँड चा शुभारंभ दिनाक 7 फेब्रुवारी 2025 या रोजी मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभहस्ते होणार असून या हॉटेल ग्रँड च्या शुभारंभ प्रसंगी अनेक राजकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.
हॉटेल ग्रँड या हॉटेलच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित नेतेमंडळी बाळासाहेब नांदगावकर, भाजपाचे नेते प्रवीण दरेकर, माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे त्याचप्रमाणे पंढरपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले संत शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला असंख्य राजकीय नेते त्याचप्रमाणे सामाजिक नेते मंडळी उपस्थित राहणार आहे अशी माहिती दिलीप बापू धोत्रे यांनी आज दिली.
हॉटेल ग्रँड या ठिकाणी अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या ठिकाणी प्रशस्त असे पार्किंगची सोय त्याचप्रमाणे बगीचा, स्विमिंग पूल, लहान मुलांसाठी खेळणी, कॉन्फरन्स हॉल लिफ्टची सुविधा एसी नॉन एसी अशा रूम्स अशा असंख्य सुविधा उपलब्ध असलेले हे एकमेव ठिकाण म्हटले तरी वावगे होणार नाही.
पंढरपूर या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांची राहण्याची सोय ही चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे पंढरपूर पासून जवळच असलेले करकम या गावांमध्ये हे प्रशस्त असे हॉटेल ग्रँड सुरू करून या ठिकाणी भावी भक्तांची तसेच प्रवाशांची राहण्याची जेवणाची ही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी भाविक भक्तांनी तसेच व्यापारी यांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी उपस्थित असंख्य मनसे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.