पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी, एक टिपर तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
या दोन्ही कारवाईमध्ये मंडळ अधिकारी विजय शिवशरण, बाळासाहेब कदम, राजेंद्र वाघमारे ग्राम महसूल अधिकारी प्रमोद खंडागळे , महेशकुमार सावंत, गणेश पिसे, संजय खंडागळे रविकिरण लोखंडे , पि पि कोईगडे ,आर बी खंदारे ,राहुल गुटाळ व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस हवलदार हनुमंत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल आवटे, सूर्यवंशी व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.