पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस ऋषिकेश सचिन पवार राहणार पुणे यांनी 115 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
त्याबद्दल देणगीदाराचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांनी मंदिर समितीची दैनंदिनी व दिनदर्शिका देऊन सन्मान केला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व विभागप्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.
सदरच्या चांदीच्या पादुका 115 ग्रॅम 500 मिली वजनाच्या असून, त्याची अंदाजीत किंमत 10 हजार 300 रुपये होत आहे.