ह.भ.प.श्रीपाद लिंबेकर यांच्या अभ्यासपूर्ण निरुपण आणि दमदार गायनाने कीर्तनाची रंगत वाढवली
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा उत्सव करकंब येथे प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवात आज चौथ कीर्तन पुष्प गुंफत सांगितले सुरुवातीला श्री चौंडेश्वरी मातेचे पूजन आणि दीपप्रज्वलन श्रीपाद लिंबेकर.विजय भागवत.संतोष टकले.डॉ प्रशांत कोल्हे.सुभाष वेदपाठक.डॉ सुरेश व्यवहारे.समुद्र सर.नामदेव माळी.नागन्नाथ भुसनर.वास्ते काकू आशा टकले.ज्ञानेश्वर दुधाणे यांचे शुभहस्ते झाले.त्यानंतर कीर्तनाला सुरुवात झाली.
पूर्वरंगामध्ये संत तुकाराम महाराजांच्या भक्त ऐसे जाणा जे देही उदास या अभंगावर निरुपण करताना सांगितले की भक्त कसा असावा आणि भक्तांची लक्षण सांगताना सांगितले की भक्त आशा पाशात न अडकता देवाची आणि समाजाची सेवा करण्यातच धन्यता मानतो.आणि त्याच श्रध्देने सातत्यपूर्ण भक्ती केली किंवा समाजसेवा केली तर त्याला भगवंत ही सहाय्यभूत होतो.यावर अनेक दृष्टांत दिली.खरे भक्त देहाबाबतीत उदासीन असतात त्यांच्या जीवनाचा विषय फक्त परमात्मा असतो.त्यामुळे ते भक्त लौकिक गोष्टींमध्ये अडकत नाहीत.अतिशय सुंदर निरुपणात अधून मधून तितकेच गोड आवाजात अभंग सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध होत होते.त्यानंतर उत्तररंगामध्ये संतश्रेष्ठ लाखा कोल्हाटी यांचे भावपूर्ण चरीत्र सांगत असताना सर्व श्रोते ब्रह्मानंदात तल्लीन झाले होते.भगवंत भक्तांचा भाव बघत असतो.कितीही कष्ट असले तरी नामस्मरण आणि निष्ठा असेल तर भगवंत तारुण नेतो अशी सुंदर लाखा कोल्हाटीची सुंदर चरीत्र सांगितले.नारदीय कीर्तनात संगीताचे विविध प्रकार त्यामध्ये आर्या.साकी.दिंडी.अभंग.गोंधळ.आदी प्रकार गात कीर्तनाला अधिक रंग भरला.त्यांना तितकीच दमदार आणि समर्पक साथसंगत हार्मोनियम गंगाधर देव तबला ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे यांनी दिली.करकंकर वासियांचे विशेष आभार मानत आदर्श रसिक कसा असावा करकंब ला येऊन जाणवले असे लिंबेकर बुवांनी आवर्जून सांगितले.
यावेळी थंडी असूनही अनेक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने अधिक परिश्रम घेत आहेत.