भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे,कर्मवीर विद्याप्रबोधिनी,सातारा. अंतर्गत घेण्यात आलेल्या मध्य विभागीय पातळीवरील सुगम संगीत गायन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल भाळवणीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गायन करून तीन क्रमांक पटकाविले आहेत.
गट क्रमांक 3 ( ११ वी १२ वी )
कु.तृप्ती सचिन चोरमले - प्रथम क्रमांक
चि. शंतनु दत्तात्रय सुतार - उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक
गट क्रमांक 2 ( ८वी ते १०वी )
कु. रिया सचिन जाधव - द्वितीय क्रमांक
सदर विद्यार्थ्यांना गायनासाठी हार्मोनियमची साथ देणारे विद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख जमदाडे पी.एस. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले जात आहे.सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य एस डी रोकडे , शिंदे सर, गोंजारी सर, खरात सर तसेच स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी राजे शिंदे व सर्व स्कूल कमिटी सदस्य सर्व ग्रामस्थांनी केले आहे.