जनजागृती सेवा संस्थेचा प्रिंट मिडीया पार्टनर म्हणून सहभाग
ठाणे प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर
शर्मिला केसरकर म्हणजे इंटरटेनमेंट,स्वर ताल लय आणि संगीत असा स्वरधारेधारेचा अनोखा मिलाप.म्युझिक मंत्राचा कुठल्याही संगितमय कार्यक्रमाचा आस्वाद घेणे एक पर्वणीच असते.ठाणेकरांना त्याचा प्रत्यय आला.म्युझिक मंत्राच्या संचालिका शर्मिला केसरकर आणि सहा संगीतकारांच्या व गायक कलाकारांच्या साथीने"महाराष्ट्राची स्वरगाथा"हा सांस्कृतिक कार्यक्रम सहयोग मंदीर हाॅल,घंटाळी,ठाणे पश्चिम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी गायिका ऑर्गनाझर शर्मिला केसरकर,गायक व सह दिग्दर्शक गणेश मांजरेकर,गायक अतुल खरे,शरद चौधरी,मंगेश पारकर,जितेश,धनंजय बी,डाॅ.राजेंद्र काळे,पेंडसे,इंद्रनील,गायिका डाॅ.माणिक काळे,संगिता,सोनाली वाळवे,प्रज्ञा तांबे,निलम,ओंमकार दाहोत्रे यांनी गायीलेल्या विविध गाण्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.जयश्री सोलकर यांचे लावणी नृत्य लाजबाब होते.महाराष्ट्राची स्वरगाथा या संगितमय कार्यक्रमात नृत्य दिग्दर्शक संदेश पाटील,विडीओग्राफर रविंद्र तिळककर,राकेश,ऑडिओक्राफ्ट भगवान भोईर,संगीत दिग्दर्शक तुषार बने यांचे विशेष सहकार्य लाभले.मध्यातंरा मध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाचे मिडिया पार्टनर म्हणुन जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते ऑर्गनाझर शर्मिला केसरकर यांचा शाल,पुष्पगुच्छ,सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाचे उपाध्यक्ष,विभाग प्रमुख विजय चव्हाण,ध्यान प्रशिक्षक,लेखिका,व्याख्यात्या आरती भार्ज,कवी वृत्तपत्र लेखक मनमोहन रोगे,अॅन्टीपायरसी सेल मुंबई चे तपाशी अधिकारी रामजित गुप्ता,देवांग कोष्टी समाजाचे ठाण्यातील जेष्ठ कार्यक्रर्ते चंद्रकांत कडुलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.या सर्वांचा शर्मिला केसरकर व त्यांच्या सहकार्यांनी भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार केला.उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.शर्मिला केसरकर या म्युझिक मंत्रा या संस्थेच्या माध्यमातून विविध ठीकाणी ऑर्केस्ट्रा आयोजित करत असतातच,आणि सामाजिक बांधिलकी म्हणूनही सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य अतुलनीय आहे.
शर्मिला केसरकर या भाजपा डोंबिवली शहर चित्रपट कामगार आघाडीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.जनजागृती सेवा संस्थेने या कार्यक्रमात प्रिंट मिडीया पार्टनर म्हणून सहभाग घेतला होता.महाराष्ट्रची स्वरगाथा या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वाती पांचाळ हसमुखाने खुमासदारपणे केले.शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.