पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
प्रमुख पाहुण्यांनी या स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांवर आधारित मार्गदर्शन केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रम सादर केले.
या कार्यक्रमाने युवकांमध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे बीजारोपण करण्याबरोबरच राजमाता जिजाऊंच्या प्रेरणादायी कार्याची जाणीव करून दिली. या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे विशेष योगदान राहिले.
या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांना अभिवादन केले.