पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामाजिक विचारांचा वारसा जोपासत विविध उपक्रमांच्या माध्यमातून राज्याच्या सामाजिकिकरणाला आकार देणाऱ्या युवा सेनेचे प्रमुख पूर्वेश सरनाईक यांचा वाढदिवस पंढरपूर तालुका युवा सेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
याप्रसंगी पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव येथील नागनाथ मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना युवा सेनेचे तालुकाप्रमुख महादेव भोसले यांच्यामार्फत मिष्टान्न भोजन देत मायेचा घास भरवण्यात आला.
या कार्यक्रमासाठी युवती सेना कार्यकारी सदस्य प्रियंका परांडे, युवती सेना पंढरपूर तालुकाध्यक्ष वर्षा चव्हाण, प्रहारचे रणजीत जगताप, युवासेना पंढरपूर तालुका अध्यक्ष महादेव भोसले, युवा उद्योजक सोमनाथ लोखंडे, पांडुरंग रोकडे, संतोष परांडे, सुधीर गणगे, शुभम यादव, स्वप्निल कदम, अक्षय शितोळे, विश्वास वसेकर, मुख्याध्यापक मधुकर भोसले यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.
यावेळी प्रियंका परांडे, महादेव भोसले यांनी आपल्या मनोगतातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामाजिक विचारांच्या प्रेरणेतून ह्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपली सामाजिक बांधिलकी जोपासत शिवसेना, युवा सेना, युवती सेना समाजातील सामान्य नागरिक व दुर्बल घटकांसाठी कार्यरत असून त्यास जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी, महादेव भोसले मित्र मंडळाचे पदाधिकारी, विद्यालयाचे शिक्षक यांनी परिश्रम घेतले.