पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी राहुल अशोक नागणे या दानशुर भाविकाने चांदीचा नक्षीदार तांब्या अर्पण केला आहे. त्याचे वजन 768 ग्रॅम असून, अंदाजे किंमत 58 हजार होत असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
संबंधित दानशुर भाविक हे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे निस्सिम भक्त तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथील रहिवाशी आहेत. याशिवाय, त्यांनी 51 हजार इतकी देणगी देखील दिली आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी उपरणे व श्रींची प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.