सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे सोलापुरातील माध्यमिक प्रशालेमध्ये इयत्ता आठवी नववी व दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तक्ता स्पर्धा आयोजित करण्यात आली.
विविध प्रशालेतील तक्त्याचे परीक्षण करून त्याप्रमाणे पारितोषिक वितरण केले जाईल. सदर स्पर्धेमध्ये एस व्ही सी एस इंग्लिश मीडियम प्रशाला अक्कलकोट रोड, रॉजर इंग्लिश मीडियम स्कूल रंग भवन, राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, आंध्र भद्रावती प्रशाला, चौडेश्वरी प्रशाला , यामधील 50 विद्यार्थ्यांनी विविध विषयावर तक्ते तयार केले. त्याचे परीक्षण लायन क्लब अध्यक्षा सौ शलाका कुलकर्णी ,झेड सी किरण कुलकर्णी लायन अशोक भांजे यांनी केले.