सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला तालुक्यातील मंगेवाडी येथील युवक दत्तात्रेय उर्फ पप्पू जावीर यांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार व्हावे यासाठी यलमर मंगेवाडी ते पंढरपूर 48 किलोमीटर अंतरावरती दंडवत घालत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीणीचे दर्शन घेतो असे नवस केला होता.
तो नवस पुर्ण करण्यासाठी जाविर यांनी आज आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची भेट घेऊन तो पन पुर्ण करण्यास जाण्यापूर्वी सत्कार करून पंढरपूरला केलेले पण पूर्ण करण्यासाठी पंढरपुरा कडे रवाना झाले.
त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी माया दत्तात्रेय जावीर होत्या तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल खरात ज्येष्ठ नेते प्राध्यापक बाळकृष्ण कोकरे ग्रामपंचायत सदस्य रमेश चोरमले समाधान चोरमले काशिलिंग चोरमले व शेकापचे अनेक कार्यकर्ते असल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली