करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सदगुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे १११ व्या पुण्यतिथी निमित्ताने करकंब येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री चौंडेश्वरी मंदिर सोमवार पेठ करकंब येथे दिनांक १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर अखंड ७ दिवस पहाटे काकडारती श्रीराम जय राम जय जय राम जप व संगीत मैफिलच आयोजन करण्यात आल्याचे जपकार ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले
यामध्ये दररोज काकडा आरती आणि सायंकाळी महिलांचे भजन असून सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता पं.अमोल निसळ आणि पं.शौनक अभिषेकी यांचे शिष्य करणं देवगांवकर यांच्या सुमधुर श्रवणीय आवाजात अभंग गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांना साथसंगत तबला गीत इनामदार हार्मोनियम वैभव केंगार पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे करणार असून दिनांक २५ डिसेंबर रोजी पहाटे ४:०० वाजता काकडारती आणि ह.भ.प. सौ.वृषाली विशाल बोधे यांचे गुलालाचे प्रवचन झालेनंतर श्रींच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी होऊन श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा करुन दुपारी १२ वाजता जपकार डॉ नवनाथ आलेकर आणि दयानंद आलेकर बंधू यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जप संकुल क्र १ यांचे वतीने करण्यात येत आहे.
सदर नाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी सेवेकरी सौ. मंगल रसाळ ज्ञानेश्वर दुधाणे विजय भागवत.दत्तात्रय इदाते.महादेव दुधाणे.बाळासाहेब इदाते.नवनाथ कांबळे.दादा धोत्रे.दयानंद आलेकर.मोहन बोधे.मोहन रसाळ.कांतीलाल टकले.विशाल बोधे.धनंजय इदाते.संतोष बुगड.मिलिंद ऊकरंडे,प्रभाकर टेके.सुरेखा मस्के.वृषाली बोधे.संगीता फडके.केशर टकले.संध्या भागवत.भैय्या रसाळ आदी जपकार नामप्रेमी अधिक परिश्रम घेत आहेत.