सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
253 सांगोला विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी स्व.आबासाहेबांनी केलेल्या 55 वर्षातील अविरतपणाने जनसेवेमुळे आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासास तुम्ही मतदारांनी तन-मन-धनाने साथ दिली.निश्चितपणे या संधीचं सोनं पुढील पाच वर्षाच्या कालखंडासाठी करेन.सांगोला विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब,कष्टकरी शेतकरी बांधवांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करीन. तुम्ही सर्वांनी मत रुपी आशीर्वाद देऊन मला आमदार बनवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. "मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार आहात".
त्याबद्दल शतशः आभार
आपलाच
डॉ.बाबासाहेब देशमुख
(विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य)