अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर सन २०२३-२४ चा ५१ वा गळीत हंगाम व काटा पूजन जि. प. उपाध्यक्ष मा. श्री. बाबाराजे देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. गव्हाण व मोळी पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे जेष्ठ सभासद श्री.चंदन तुपे (मेडद), श्री.जगन्नाथ कोरटकर (गुरसाळे), श्री.मनोहर देवकर(मोही), श्री.ज्ञानदेव खुडे(मांडवे), श्री. जगन्नाथ महामुनी(फोंडशिरस), श्री. साधू गोरे(फोंडशिरस), श्री.मच्छिन्द्र हुंबे(हनुमानवाडी(क)), श्री.श्रीरंग तरडे(मोटेवाडी), श्री.महादेव गेंड(भांबूर्डी), श्री.सुभाष शिंदे(माळशिरस), श्री.दस्तगीर मुलाणी(नातेपुते), श्री. कृष्णदेव पवार आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी कै. काकासाहेब व अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ सभासद यांनी केले.
यावेळी ऊस वाहतूक बैलगाडी मुकादम गणेश कोडलकर, शेतकरी सभासद अंकुश डुबल यांच्या बालगाडीचे पूजन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन विधानपरिषद तथा श्री शंकर सहकारी चे चेअरमन मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते.
तसेच व्हा. चेअरमन. ऍड मिलिंद कुलकर्णी, मा. सौ. सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, माजी सभापती मा. सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील, माजी उपसभापती मा. श्री अर्जुनसिंह मोहिते पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा. श्री. मामासाहेब पांढरे, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, आदी मान्यवर उपस्थिती होते.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शिवामृत दूध संघांचे संचालक, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, खरेदी विक्री संघांचे संचालक, श्री शंकर सहकारी चे सर्व संचालक, शेतकरी सभासद, सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, व्यापारी, ग्रामस्थ व कारखान्याचे एक्झिकुटीव्ह डायरेक्टर श्री. स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.