भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC चा ग्रामपंचायत सदाशिवनगर ला दुसऱ्यांदा तर पुरंदावडे ला प्रथम विमा ग्राम पुरस्कार जाहीर
सदशिवनगर प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय आयुर्विमा महामंडळ ( LIC ) यांचेतर्फे दिला जाणारा बिमा ग्राम पुरस्कार ग्रामपंचायत सदाशिवनगर ला सलग दुसऱ्यांदा तर ग्रामपंचायत पुरंदावडे ला प्रथमच मिळाला आहे.
या पुरस्काराचे वितरण विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच केले जाणार असल्याची माहिती LIC प्रतिनिधी सागर उरवणे यांनी दिली.
या पुरस्काराचे स्वरूप बिमा ग्राम पुरस्कार व गावाच्या विकासासाठी १ लाख रुपये निधी असा असणार आहे. यामुळे गावाच्या विकासामध्ये भर पडणार असून आपल्या जीवनशैली मध्ये LIC विमा असणे किती महत्वाचे आहे हे देखील समजणें गरजेचे आहे. धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC ) अगदी किफायशीर ठरु शकते.
आज या उपक्रमामुळे समाजामध्ये याची जनजागृती तर हाईलच परंतु एक आदर्श देखील निर्माण होईल. या पुरस्कारामध्ये LIC प्रतिनिधी सागर उरवणे यांची मोलाची कामगिरी आहे. त्यांच्यामुळे या दोन्ही गावांच्या विकासामध्ये भर पडणार आहे. त्यामुळे त्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.