भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे कार्य तपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट सांगोला यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त जागर स्त्री शक्तीचा या अंतर्गत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता शाकंभरी देवी मंदिर भाळवणी येथे खास महिलांच्या करीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच भंडीशेगाव येथील श्रीनाथ विद्यालयाच्या पटांगणावर गुरुवार दिनांक 10 ऑक्टोंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रथम बक्षीस पैठणी व नथ द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस आटा चक्की चौथे बक्षीस शिलाई मशीन पाचवे बक्षीस मिक्सर त्याचबरोबर कार्यक्रमास येणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी आकर्षक भेट वस्तूचे वाटप करण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती चारुशीला काटकर व डॉ.नेहा पियूष पाटील यांच्यातर्फे करण्यात आली आहे.