पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये मंगळवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी गेट एक्झामिनेशन्स आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची तयारी या विषयावर प्रा. सुशीर परसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये प्रा. सुशीर परसाई यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रा. सुशीर परसाई हे मेड इझी इन्स्टिट्यूट, दिल्ली मध्ये सीनियर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यादरम्यान शिशिर परसाई यांनी विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग सर्विसेसच्या माध्यमातून विविध पब्लिक सेक्टर्स अंडरटेकिंग मध्ये असणाऱ्या संधी बद्दल अनमोल मार्गदर्शन केले. गव्हर्मेंट च्या विविध सर्विसेस मध्ये गेट या एक्झाम च्या माध्यमातून कशा प्रकारे सिलेक्शन होऊ शकते तसेच इतर सेक्टर मधील काही संधी याविषयी अनमोल मार्गदर्शन केले.
या व्याख्यानासाठी प्रथम व द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग विभागातील ३०० हून अधिक अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
गव्हर्मेंट च्या विविध विभागामध्ये असणाऱ्या मोठ्या संधी बाबत विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अभिजीत सवासे, प्रा. सिद्धेश पवार, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. प्रदीप व्यवहारे आदींसह महाविद्यालयातील अनेक शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी सानिका बाबर आणि आदेश कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात येता कॉलेजमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.