मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
सन २०२१ पासून अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव पाथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश महासंघाचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून आणि पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय उपाध्यक्ष दिनकर पतंगे,राष्ट्रीय सचिव महादेव खटावकर,कोषाध्यक्ष पांडुरंग दाभोळे, प्रसिद्धीप्रमुख संतोष मुळे,पुणे जिल्हा अध्यक्ष सुनिल होमकर,कोल्हापूर मध्ये भरत कोळेकर या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणेबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवून दिला होता. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आलेली आहे.
ही मोठी चांगली आनंदाची बातमी आहे या अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रयत्नाने सातत्य ठेवून काम करीत आहेत त्याला आता यश आलेले आहे.