मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
शिंपी समाज संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आज मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीमध्ये संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केल्याची बातमी मुंबईहून प्राप्त झाली आहे.
यात शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे (इतर मागास बहुजन कल्याण) महामंडळे जाहीर करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सागर निवासस्थानी काही दिवसांपूर्वी शिंपी समाज संघटना व पदाधिकारी यांनी बैठक घेऊन निवेदने दिली होती त्यात महामंडळाची मागणी करण्यात आली होती .
सर्व समाज बांधवांनी अशी इच्छा धरत अनेक पदाधिकारी यांनी यासाठी अनेक दिवस शासन दरबारी प्रयत्न केले या सर्वांचे आभार तसेच महाराष्ट्र शासनाने सर्व समाज घटकांना न्याय देत सर्वांना एकत्रित घेऊन राज्याच्या विकास करण्याची संकल्पना राबवत आहेत.
यासाठी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सर्वांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र सर्व सभासद व सदस्य समाज बांधव यांनी मानले आहेत.