भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी तालुका पंढरपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयात सखी सावित्री समिती अंतर्गत गुड टच आणि बॅड टच या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एस डी रोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये शाळेमध्ये व शाळेबाहेर वावरताना चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टी व वर्तन या संबंधी सतर्क राहून वेळीच शिक्षक व पालकांना सांगण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी मार्गदर्शक शिक्षिका एम. के. भोसले यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये सखी सावित्री समिती अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारे विविध उपक्रम त्याचबरोबर महाराष्ट्र बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या CHIRAG ॲप ची माहिती व POCSO कायद्याविषयी ची माहिती आणि चाइल्ड हेल्पलाइन नंबर 1098 विद्यार्थ्यांना सांगण्यात आला.
त्यानंतर शिक्षिका नागटिळक यु. व्ही यांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाद्वारे गुट टच व बॅड टच विषयी माहिती दिली स्वसंरक्षणासाठी NO.. GO.. TELL...हा मंत्र विद्यार्थ्यांना सांगितला. म्हणजेच चुकीच्या गोष्टींना NO म्हणणे. GO म्हणजे तिथून निघून जाणे, व TELL म्हणजे आक्षेपार्ह वाटणाऱ्या गोष्टी घरच्यांना सांगणे त्याचबरोबर अनोळखी व्यक्तींना घरातील कोणतीही माहिती मोबाईल नंबर न देण्याचाही सल्ला दिला. मुलींच्या अडचणीच्या काळात 1089 हा हेल्पलाइन नंबर देण्यात आलेला आहे.
शेवटी रणजित दडस यांनी आभार मानले. सर्व शिक्षक शिक्षिका यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले. या कार्यशाळेस विद्यार्थिनीनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.