बुलढाणा प्रतिनिधी तेज न्यूज
महिला अध्यक्षा.मा.आदि.संघर्षकन्या.दुर्गा ताई माने आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य याची मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय येथे चालू असलेल्या अन्यत्याग आमरण उपोषणाला भेट देऊन जाहिर पाठिंबा देण्यात आला.
आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ दुर्गा ताई माने समाज सेविका पंढरपूर ची कोळ्यांची रणरागिणी म्हणाल्या, की आठ दिवसांमध्ये आमचं उपोषण नाही सुटले तर आम्ही या सरकारला खाली मुंडी वर पाय करून त्यांची जागा दाखवून त्यांना साडी चोळीचा आहेर देऊ व त्या प्रांतला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या समाजाला न्याय दिल्याशिवाय मी गप बसणार नाही.असे आवाहन दुर्गा माने यांनी केले आहे.