मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
पालक-शिक्षक समितीची शुल्क नियमानुसार ५० रु असताना पालकांकडून रु १०० रु फि आकारल्याचे प्रकरण आता अंजुमन आलाना इंग्लिश शाळेला भोलणार असल्याची बाब समोर आली आहे, शिक्षण निरीक्षक दक्षिण मुंबई देविदास महाजन यांनी शाळा मुख्याध्यापकांना महाराष्ट्र शैक्षणिक संस्था १९८७ (कॅपिटेशन फि घेण्यास प्रतिबंध) या कायद्याचे उल्लंघन केल्या बद्दल खुलासा सादर करणाचे आदेश दिले व तीन दिवसात उत्तर देण्यासाठी ताकीद दिली अन्यथा महाराष्ट्र विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचे कळविले.
पालक जाहीर हुसेन ईद्रीसी या कडून रु ५० ऐवजी रु १०० हि पालक शिक्षक समितीची फि शाळेने घेतली होती, नियमानुसार अशी ज्यादा फि आकारता येत नाही आणि जर अशी फि घेतल्याचे सिद्ध झाल्यास महाराष्ट्र शैक्षणिक संस्था १९८७ (कॅपिटेशन फि घेण्यास प्रतिबंध) या नियमाचे उल्लंघन होते व या मुळे शाळा मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हा दाखल होतो असा नियम आहे, या प्रकरणात शाळा मुख्याध्यापकांनी आम्ही पालकांच्या संमतीने रु ५० ऐवजी रु १०० फि घेतली असा खुलासा सादर केला आहे, पण नियमानुसार असे करु शकत नाहीत.
म्हणूनच शिक्षण निरीक्षकांनी निर्वाणीचा ईशारा शाळा प्रशासनास दिला, महासंघाचे नितीन दळवी यांनी या प्रकरणी शाळा मुखयाद्यापकावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी केली आहे कारण तसे सिद्ध देखील झाले आहे, आता शाळा प्रशासन या वर काय उत्तर देणार आणि शिक्षण निरीक्षक फौजदारी गुन्हा दाखल करतात किंवा नाही या वर पुढील कारवाई अवलंबून आहे असे दळवींचे म्हणाणे आहे.