पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी "गेट परिक्षेतील नोकरीच्या संधी" या विषयावर शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी प्रा. शंकर वदने यांचे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रा.शंकर वदने यांचे गेट प्रेपरेशन चॅलेंजेस अॅण्ड ऑप्युचुनिटीज फाॅर स्टुडंट्स या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान महाविद्यालयाच्या वतीने प्रा. शंकर वदने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यामध्ये गेट प्रेपरेशन टिप्स, शाश्वत सामग्री व पुस्तके याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हे व्याख्यान इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये १५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा आदींसह इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी सानिका बाबर हिने केले.