पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गावरान फिल्मस् प्रॉडक्शनच्या चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीजच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवर विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे कलाकार, निर्माता सुभाष मदने, दिग्दर्शक बाळासाहेब उर्फ ह.भ.प. भरत महाराज शिंदे आणि रामदास जगताप यांचे (बाळासाहेब, रामभाऊ व सुभाषराव) यांनी विठ्ठल व माता रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
त्यावेळी पंढरपूर पंचायत समिती सदस्य, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग संभाजी शिंदे,महेश इंगोले व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.