पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष कै.बिंदूमाधव जोशी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील आयोजित समारंभात प्रतिमेस पुष्पहार व अभिवादन करण्यात आले होते.
यावेळी संघटनेचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास,जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते,तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,सचिव प्रा.धनंजय पंधे, सदस्य इंद्रजीत फडे,श्रीराम साळुंखे आदि उपस्थित होते.