सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिनी शिक्षक दिनाच्या औचित्य साधून गुरूविद्या प्रतिष्ठानचे गुरूविद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण हॉटेल समॄध्दु येथे समारंभ थाटात संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष राजशेखर नागणसुरे. माजी गटशिक्षण अधिकारी अक्कलकोट.प्रमुख पाहुणे म्हणून नरेश बदनुरे माजी प्राचार्य संगमेश्वर कॉलेज, माजी प्राध्यापक बिराजदार,प्रतिष्ठानचे संस्थापक श्री सोमशेखर भोगडे,अध्यक्ष श्री सातलिंग शटगार, उपाध्यक्षा राजश्री तडकास, सहसचिवा सौ रेणुका हब्बू , कार्याध्यक्षा नमिता थिटे, श्री विजयकुमार भोगडे, यांची उपस्थिती होती. सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्षा राजश्री तडकासे यांनी प्रास्ताविक सादर केले. अध्यक्ष श्री सातलिंग शटगार यांनी प्रमुख पाहुण्याचे ओळख, स्वागत करून सत्कार केले.
पुरस्कार प्राप्त शिक्षक,श्री राजकुमार उंबरजे सिद्धेश्वर उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर प्रशाला,श्री नागराज पंडित पाटील रामलिंगेश्वर प्रशाला तीर्थ,श्री महादेव करे यमाई देवी प्राथमिक आश्रम शाळा मार्डी. श्री रुद्रमणी वैजिनाथ स्वामी सहशिक्षक करंजकर विद्यालय सोलापूर.श्रीमंती मिनाक्षी किरण कुलकर्णी संगीत शिक्षिका नू..म.वि प्राथमिक शाळा सोलापूर, श्रीमती प्रिती अंकुश दिवसे सहशिक्षिका मनपा मुलांची मराठी शाळा रामवाडी सोलापूर,श्रीमती शबाना शकूर जिनेदी. सेवानिवॄत सहशिक्षिका मनपा मराठी मुलांची शाळा रामवाडी सोलापूर, दत्तात्रय जयहिंद सुतार शिक्षकेत्तर कर्मचारी छत्रपती शिवाजी प्रशाला सोलापूर,शिक्षकेतर कर्मचारी राचया इरया स्वामी गेनसिध्द प्रशाला कुंभारी.आदर्श शाळा पुरस्कार.श्रीदत्त प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर.
श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला सोलापूर. शिक्षकेतर कर्मचारी , दोन उपक्रमशील आदर्श शाळांना मान्यवराच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. राजकुमार उंबरजे उपमुख्यापक यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आदर्श शाळेच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक श्री भिमाशंकर बिराजदार यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मधील नाते कसे असावे. शिक्षक हा सध्याचा कळात नव नवीन शिक्षण प्रणालींचा वापर करावा. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा देऊन गुरूविद्या प्रतिष्ठा नावाप्रमाणे कार्यरत आहे असे गौरवोद्गार केले.
संगमेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य नरेश बदनुरे यांनी शिक्षक हा चोवीस तास शिक्षक असतो. शिक्षणाच्या सध्याची नवनवीन तंत्रज्ञान बदल माहिती सांगुन शिक्षकांचं अभिनंदन केले. प्रतिष्ठानचे कौतुक केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी गटशिक्षण अधिकारी राजशेखर नागणसुरे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, दोन्ही आदर्श शाळाचे अभिनंदन करुन शिक्षकांनी मुलांना संस्कार क्षम सुस्कुत विद्यार्थी घडवावे.जो विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणजे तो शिक्षक आदर्श शिक्षक असतो असे गौरवोद्गार केले.
गुरुविद्या प्रतिष्ठानचे कार्य हे नावाप्रमाणेच कार्य आहे.आणि शुभेच्छा दिल्या स्वागत पुरस्काराचे स्वरूप शाल, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, बुके ,शाल, हार असे होते. शेवटी आभार प्रदर्श संस्थापक श्री सोमशेखर जगदेवी ईरप्पा भोगडे यांनी केले.तर सुत्रसंचलन सचिव श्रीदेवी यळमेली यांनी केले आहे.