सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला तालुक्यातील खिलारवाडीचे सुपुत्र व रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांना सोलापूर येथे महाराष्ट्र राज्यांमधून १२५ पुरस्कार प्राप्त लोकांसमवेत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पाहता हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. डॉ. दत्तात्रय काळेल यांना या अगोदरही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभागाचे चेअरमन संजीव कुमार पाटील मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य प्राचार्य आर .डी. गायकवाड, जनरल बॉडीचे सदस्य प्राचार्य जे. जी. जाधव, माढ्याचे माजी आमदार व सी.डी.सी. चे सदस्य एडवोकेट धनाजी तात्या साठे, माढा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार हेळकर, के.बी.पी. महाविद्यालय पंढरपूरचे प्राचार्य डॉ. सी जे खिलारे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे व दहिवडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .टी .साळुंखे यांनी अभिनंदन केले आहे.