पनवेल प्रतिनिधी तेज न्यूज
आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री.बापूसाहेब डी. डी. विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सीमा कांबळे यांना " पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार २०२४" मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या, आपल्या लेखनाच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या आणि नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातुन शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉ.सीमा कांबळे यांनी आत्तापर्यंत शिक्षण, विधी, पत्रकारिता, समुपदेशन अशा विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या विविधांगी कार्याची दखल घेत संपादक मा. श्री.गणेश कोळी यांच्या पनवेल टाइम्स नी त्यांना "पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार २०२४" ने सन्मानित केले .
यावेळी मा. श्री. गणेशजी कोळी, मा.श्री.दा.कृ.सोमण,मा. श्री.प्रशांतजी ठाकूर, मा. श्री. महेंद्रजी घरत, सिनेअभिनेत्री मा. श्रीम.मुग्धा गोडबोले,मा. श्री.एल.बी.पाटील, अनेक पत्रकार आणि नागरिक यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला
या अगोदर देखील डॉ. सीमा कांबळे यांना लोकमत आयोजित आम्ही सावित्रीच्या लेकी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल टीचर अवार्ड, राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार, विद्याभूषण पुरस्कार, मावळ वार्ता विशेष गुणगौरव पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री.धनराजजी विसपुते व संचालिका मा. सौ.संगीता विसपुते यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.