पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धेमध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधील ओम रणदिवे याने कंपाऊंड या विभागामध्ये व कृष्णा शिंदे याने आर्चरी रिकव्हर या विभागामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले व विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले या स्पर्धा आरण माढा येथे पार पडल्या या स्पर्धा अतिशय चुरशीच्या व निर्णयाक ठरल्या.
दोघांनाही कोच सागर सुर्वे यांचे मार्गदर्शन मिळाले या दोघांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे ,सहशिक्षक राजेंद्र मोलाणे, दीपक देशमुख ,नियाज मुलाणी, सोमनाथ भुईटे ,संतोष पवार ,प्रकल्प संचालिका वर्षा मोरे, शितल बागल, लीना बागल ,शितल मस्के, मसरुद्दीन पटेल ,सिमा रकटे, अजय मोरे आदींनी दोघांचेही अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या विभागीय स्पर्धा पुढील महिन्यामध्ये पुणे येथे होणार असून या स्पर्धेसाठी विभागातील सर्व जिल्ह्यातून स्पर्धक उपस्थित राहणार आहेत .
या यशस्वी वाटचालीने शिवरत्न ज्युनिअर कॉलेजने क्रीडा क्षेत्रातील आपला असणारा दबदबा कायम ठेवला आहे .तालुका, जिल्हा ,विभाग ,राज्य, राष्ट्रीय स्तरावर शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधील बरेच विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.