पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
चिंचणी येथे 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून सगळीकडे साजरा करण्यात येतो. या दिवशी चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र येथे पिराची कुरोली येथील सर्व जि. प. शाळा, मॉडर्न हायस्कूल, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल यामधील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना लहान मुलांच्या भावविश्वातील बाल चित्रपट दाखवण्यात आले. चित्रपट व चिंचणी पर्यटन यामधून दिवसभर मुलांना आनंद घेता आला.
सदर कार्यक्रमाच्या समारोपाला आ. बबनदादा शिंदे जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर, चेअरमन कल्याणराव काळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, विद्यार्थी चित्रपट चळवळीचे मिलिंद यादव हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की उजनी चा जलपर्यटन विकास आराखडा तयार करत असताना यामध्ये उजनी नरसिंहपूर चिंचणी पंढरपूर अक्कलकोट असे सर्किट जोडण्यात येणार आहे यामध्ये चिंचणीचा समाविष्ट करून पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना रोजगारा बरोबर त्यांचा आत्मसामान वाढवणार आहे.त्याचबरोबर प्रधानमंत्री सूर्य घर योजना च्या माध्यमातून संपूर्ण गावासह सार्वजनिक इमारतीवर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांनी बोलताना सांगितले की चिंचणीकरांनी पर्यटनाच्या माध्यमातून उभं केलेले काम शासनाला दिशा देणारे व अंतर्भूत करणारे आहे. भविष्यात या जिल्ह्याचा पर्यटन अधिकारी म्हणून चिंचणीकराच्या कामला शासन स्तरावर प्रेझेंट करणार आहे. मिलिंद यादव यांनी विद्यार्थ्यांना चांगले चित्रपट दाखवणे किती आवश्यक आहे याबाबत सविस्तर मांडणी केली. यावेळी चिंचणी ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. त्याचबरोबर संपूर्ण गावांमधून ई- कारमधून फेरफटका मारण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी पिराची कुरोली परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र यांच्या वतीने शशिकांत सावंत चंद्रकांत पवार शरद सावंत मोहन अनपट दत्तात्रय अनपट आप्पा जाधव अमोल जाधव सोपान सावंत शिवाजी अनपट सविता सावंत कस्तुरा जाधव मुक्ताबाई सावंत वैशाली सावंत नंदा कापसे मीरा सावंत राधिका अनपट अनिता जाधव इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन समाधान काळे यांनी केले प्रस्ताविक शशिकांत सावंत आभार मुख्याध्यापिका ललिता मोरे यांनी मानले.