सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीची रिजन चेअरमन लायन राहुल दोशी यांची अधिकृत भेट . आदर्श शिक्षक व अभियंता यांना पुरस्कार रिजन चेअरमन एम.जे.एफ लायन राहुल दोशी, झोन चेअरमन लायन नंदिनी जाधव यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर अध्यक्ष लायन ज्ञानेश्वर कुलकर्णी, सचिव लायन सोमशेखर जगदेवी ईरप्पा भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर यांची उपस्थिती होती. लायन अध्यक्ष ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी घंटा नादाने कार्यक्रम सुरुवात केली. ध्वजवंदन लायन नागेश बुगडे यांनी केले. अध्यक्षाच्या हस्ते सर्व रिजन चेअरमन लायन राहुल दोशी, झोन चेअरमन लायन सौ नंदिनी जाधव यांचा सत्कार करण्यात आले.
रिजन चेअरमन यांची ओळख झोन चेअरमन लायन नंदिनी जाधव यांनी केले. यंदाच्या वर्षीचे आदर्श शिक्षक सौ संध्या कुनाळे, प्राचार्या, शुभांगी रीजन एक मधील लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीची रिजन चेअरमन यांची अधिकृत भेट देऊन आदर्श शिक्षक व अभियंता यांना शुभेच्या दिल्या.