पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
लक्ष्मी टाकळी (ता.पंढरपूर) येथील पालवी ज्ञान मंदिर प्रशालेमध्ये गुरुवारी (ता.५) शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन' हा शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनीनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या भूमिका सादर करीत आपल्या गुरु, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन प्रवासावर शिक्षकांनी प्रकाश टाकला.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन' हा शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनीनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या भूमिका सादर करीत आपल्या गुरु, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमादरम्यान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन प्रवासावर शिक्षकांनी प्रकाश टाकला.या कार्यक्रमास प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.