भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी या विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे विद्यालयाचे प्राचार्य रोकडे , विद्यार्थी प्राचार्य कुमारी गौरी गोरे, उपराचार्य इम्रान शेख पर्यवेक्षक ऋतुराज शिंदे ,विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.
इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षेकतर कर्मचारी यांचा सन्मान केला.
विद्यार्थिनी शिक्षक यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. भाळवणी गावचे उपसरपंच नितीन शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष भाषणात शिक्षक प्राचार्य गौरी गोरे तिने आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी सर्व मान्य उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार मिताली बोधे हिने मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा शिंदे व सलोनी पटेल यांनी केले.
इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी दिवसभर पूर्ण शाळेचे कामकाज सुरळीत पार पडले. विद्यार्थी शिक्षक म्हणून 100 विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले. फिजिकल टीचर म्हणून शिवराज जाधव याने काम पाहिले. शिक्षक दिन हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.