भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल या महाविद्यालयांमध्ये शासकीय एलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षाचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेकरिता भाळवणी केंद्रात 561 विद्यार्थी बसले होते. एलिमेंट्री परीक्षेसाठी 340 तर इंटरमिजिएट परीक्षेकरिता 221 विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी, कर्मवीर विद्यालय पिलीव, यशवंतराव चव्हाण विद्यालय फळवणी, विद्यामंदिर विद्यालय गार्डी ,माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी, शिवाजी विद्यालय महुद ,प्रोग्रेस विद्यालय कोर्टी या विद्यालयाचे विद्यार्थी चित्रकला स्पर्धेसाठी सहभागी झाले होते.
या परीक्षेकरिता केंद्रप्रमुख म्हणून प्रभारी प्राचार्य एस डी रोकडे, सहाय्यक केंद्रप्रमुख डी एल गोंजारी, सहाय्यक शिक्षक म्हणून डी एम माने,एम पी मासाळ, जे डी जमदाडे, पी एस जमदाडे ,आर बी झांबरे, एस एम सोनवणे, वाय सी जाधव, एस एस एवळे ,एस के काळे, सचिन सराटे व आनंद वाघमारे यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.