सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
मार्कंडेय ऋषी स्वामी जन्म शताब्दी वर्ष महोत्सव निमित्ताने मार्कंडेय ऋषी स्वामी मंदिर लक्ष्मी मार्केट जवळ सोलापूर येथे आपलं रेणुका भजनी मंडळाच भजन सेवा करण्याची संधी मिळाली.
यावेळी प्रथम मंदीर समितीचे अध्यक्ष सुरेश फलमारी, व माझी सहकारी मैत्रीण भाजप महिला आघाडी शहर अध्यक्ष.व माजी नगरसेविका विजया ताई वडैपली यांच्या सहकार्याने आपल्या भजन सेवा करायला बोलावले. मंदीर समितीचे अध्यक्ष,व सर्व संचालकाचे आभार मानते. तसेच आज माझ्या सख्या श्रावण मानसी हिरवळ दाटे चोहिकडे. या उक्तीप्रमाणे पोपटी साडी परिधान करून आल्या. थिटे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले व धन्यवाद दिले. शोभाताई, वैशाली , शीला ताई, कटारे ताई, रेखाताई, प्रतिभा वहिनी, संध्या मळेकर, प्रचिती, अनिता, सविता, नमिता . उपस्थित होत्या.