विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे बक्षिस वितरण उत्साहात संपन्न..!!
शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
शनिवार दि ३ ऑगस्ट रोजी शेळवे येथील सणराईज पब्लिक स्कूल येथे श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, जिल्हास्तरीय चित्रकला,निबंध स्पर्धा व शालेय रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या,या सर्व स्पर्धा प्रत्येकी तीन-तीन गटात घेण्यात आल्या होत्या, त्यातून तब्बल चार ते पाच क्रमांक काढण्यात आले होते,जिल्हास्तरीय वक्तृत्व,चित्रकला व निबंध अशा स्पर्धेत एकूण ३६ विध्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली, तर रांगोळी स्पर्धेतील एकूण १४ विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली..
सदर बक्षिस वितरण कार्यक्रम सोमवार दि ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वा शेळवे गावचे सरपंच श्री.अनिल ज्ञानोबा गाजरे, उपसरपंच किरण देवचंद गाजरे,शेळवे गावचे प्रगतशील बागायतदार गोपाळ गाजरे,युवा उद्योजक पंकज रमेश गाजरे,प्रगतशील बागायतदार संतोष आत्माराम गाजरे,सणराईज ऑफसेट चे मालक समाधानभैय्या गाजरे,वाखरी गावचे प्रतिष्ठित नागरिक गजानन गायकवाड,अकलूज चे उत्तम दुपडे,भीमराव पांडव तसेच सणराईज पब्लिक स्कूल चे संस्थापक सचिव अंकुश गाजरे, संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे, संस्थापक सदस्या सौ. ज्योती गाजरे, संस्थापक अध्यक्ष तथा श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान गाजरे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला...
आयोजित करण्यात आलेल्या एकूण चार स्पर्धा प्रकारात तब्बल साडेचारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यातील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
मोठा गट (जिल्हास्तरीय वक्तृत्व)
प्रथम क्रमांक:कु.गौरी दादासाहेब पांडव नारायण चिंचोली,द्वितीय क्रमांक:कु.तनया तानाजी आसबे कौठाळी,तृतीय क्रमांक कु.संचिता बाबा पवार खेडभाळवणी; चतुर्थ क्रमांक;कु.लक्ष्मण यदु वाघमोडे वाखरी
वक्तृत्व स्पर्धा (मध्यम गट)
प्रथम क्रमांक:कु.संस्कृती उत्तम दुपडे अकलूज,द्वितीय क्रमांक कु.मधुरा महेश कुसुमडे बोहाळी,तृतीय क्रमांक ईश्वरी संताजी कौलगे पिराची कुरोली
वक्तृत्व (लहान गट)
प्रथम क्रमांक:कु. पोरे अथर्व नवनाथ वाखरी,कु.गाजरे शिवराज सुशांत शेळवे;
कु.गाजरे सानिका सचिन शेळवे
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे
मोठा गट (चित्रकला)
प्रथम क्रमांक कु.सई प्रकाश गाजरे,द्वितीय क्रमांक कु.प्रतिक्षा अन्नासो पवार,खेडभाळवणी,तृतीय क्रमांक: कु.शिवम सिताराम शिंदे पिराची कुरोली
चित्रकला स्पर्धा (मध्यम गट)
प्रथम क्रमांक: कु.श्रवण हनुमंत निंबाळकर वाखरी,द्वितीय क्रमांक:कु. सिद्धी उमेश पोरे वाखरी तृतीय क्रमांक:कु. ज्ञानेश्वरी विकास होळकर होळे
चित्रकला (लहान गट)
प्रथम क्रमांक:कु. निधी अशोक होळकर होळे; द्वितीय क्रमांक स्पृहा नागनाथ गायकवाड भंडीशेगाव; तृतीय क्रमांक:कु कादंबरी संदीप सावंत शेळवे.
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे
निबंध स्पर्धा (लहान गट)
प्रथम क्रमांक:कु.होटे स्वरा तानाजी होळे,द्वितीय क्रमांक:कु श्रुती हनुमंत निंबाळकर वाखरी, तृतीय क्रमांक: समृद्धी दीपक पवार खेड भाळवणी
निबंध स्पर्धा (मध्यम गट)
प्रथम क्रमांक:कु.पवार प्रतिज्ञा आण्णासो खेड भाळवणी, द्वितीय क्रमांक:कु.प्रतीक्षा प्रकाश साळुंखे व संस्कृती समाधान गाजरे;तृतीय क्रमांक:कु.पूर्वा बिभीषण साळुंखे खेड भाळवणी
निबंध स्पर्धा (मोठा गट)
प्रथम क्रमांक: कु.संचिता बाबा पवार खेडभाळवणी;द्वितीय क्रमांक:कु. प्राची मारुती यलमार भंडीशेगाव; तृतीय क्रमांक तनया तानाजी आसबे कौठाळी
शालेय रांगोळी स्पर्धेचे मानकरी पुढीलप्रमाणे
रांगोळी (लहान गट)
प्रथम क्रमांक; कुमारी संस्कृती समाधान गाजरे व जोया सत्तार शेख; द्वितीय क्रमांक:कुमारी प्रगती पोरे व सृष्टी पाटील; तृतीय क्रमांक: कुमारी आर्या येलपले व ईश्वरी पवार
रांगोळी स्पर्धा (मोठा गट)
प्रथम क्रमांक:कु.सई प्रकाश गाजरे व संचिता बाबा पवार;द्वितीय क्रमांक: कुमारी प्रतीक्षा लोकरे व अक्षरा धुमाळ, तृतीय क्रमांक: कु. प्राची यलमर, प्रतीक्षा पवार व विद्या लोकरे
जिल्हास्तरीय स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र,सन्मानचिन्ह व शालेय शैक्षणिक साहित्य भेट देऊन गौरविण्यात आले,शालेय स्पर्धेतील विद्यार्थ्यांना कंपास, पॅड व वह्यांसह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले..,तसेच अभिजित आबा पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले,सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक,कर्मचारी, पालक,विध्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले,सर्व सहकारी शिक्षक, कर्मचारी,पालक व ग्रामस्थ यांचे अभिजित पाटील मित्र परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले,तसेच सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे सनराईज पब्लिक स्कूल शेळवे व अभिजित आबा पाटील मित्रपरिवार शेळवे च्या वतीने शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.
शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.