सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पसंतीसाठी सिंहगडची महाविद्यालये आघाडीवर
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी चांगली पसंती दर्शवल्याचे चित्र आहे. या वर्षी सोलापूर शहर व जिल्ह्यात एकूण ५७०८ जागा उपलब्ध आहेत त्यापैकी पहिल्याच फेरीत ४३१६ म्हणजेच सुमारे ७६% जागा भरण्याच्या मार्गावर आहेत. यावरूनच गतवर्षीच्या तुलनेत अभियांत्रिकी साठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी प्रथमवर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांच्या पसंतिक्रमानुसार महाविद्यालये ऍलॉट झाली असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यात विद्यापीठ सलगनित महाविद्यालयांत केगाव येथील एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयास सर्वाधिक विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे.
माहिती तंत्रज्ञानाचे वाढलेले महत्व लक्षात घेता कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन शाखांना विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असली तरी इलेक्ट्रिकल, सिव्हिल व मेकॅनिकल या मूलभूत शाखांना सुद्धा विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सिंहगड सारख्या महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांनी पुणे ऐवजी या महत्त्वाच्या ब्रांचेस साठी सिंहगड सोलापूरला पसंती दर्शवली आहे.
सोलापूरच्या एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रथम पसंती देण्याचे मुख्य कारणे म्हणजे २०२३ चा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, तसेच चालू वर्षीचा उत्कृष्ट संस्था पुरस्कार. याशिवाय नवीन शैक्षणिक धोरणा नुसार विद्यार्थ्यांना मेजर व मायनर डिग्री मिळवण्याची संधी, तसेच प्रथम वर्षातच प्रोजेक्ट बेस लर्निंग ची संकल्पना राबवणे, टीजी स्कीम व मागील दोन वर्षांमध्ये स्मार्ट इंडिया हॅक्याथॉन तसेच इतर स्पर्धांमध्ये देशपातळीवरील विजेतेपद ही आहेत असे विद्यार्थी पालक आणि तज्ञांचे मत आहे.