सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१, सांगोला यांनी जाणीवपूर्वक नियमबाह्य दस्तांची नोंदणी केली असल्याने चव्हाण यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळातील स्थानिक कामकाजाची चौकशी करून सेवेतून बडतर्फ करावे, म्हूणन दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांनी दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पासून जिल्हाधिकारी कार्यालयसोलापूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले असून सांगोला येथील
दुय्यम निबंधक श्रेणी -१ कार्यालय येथील सध्या कार्यरत असलेल्या श्री. एस. बी. चव्हाण यांनी सांगोला येथील कार्यभार घेतले पासून बेकायदेशीर दस्त नोंदण्यांचा सपाटा लावला आहे. आर्थिक लाभाच्या हव्यासापोटी मुळ मालकाच्या परस्पर दस्त नोंदणीची अनेक प्रकरणे उघडकिस आली असून या बाबत चव्हाण यांची खातेनिहाय चौकशी होणे गरजेचे असल्याची तक्रार यापूर्वी दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिरझा गालिब मुजावर यांनी जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती परंतु अद्याप चव्हाण यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने अखेर बेमुदत आंदोलन चा मार्ग स्वीकारावं लागल्याची खंत दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिरझा गालिब मुजावर यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली असून त्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय मधील उपलब्ध कागदपत्रा नुसार मुळ जमिन मालक वर्षभर पूर्वी मयत असताना त्यांचे हाताचे ठसे, फोटो कसे काय घेतले? असा प्रश्न दैनिक तुफान क्रांती चे मिरझा गालिब मुजावर यांनी प्रशासन ला विचारला असून सांगोला येथील दुय्यम निबंध कार्यालयाच्या भ्रष्टाचार संदर्भात एका पत्रकाराला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी उपोषण करावे लागते ही बाब अत्यंत खेदाचे असून असल्याचे दुय्यम निबंधक कार्यालय सांगोला येथील अधिकारी त्याचे सहकारी कर्मचारी यांनी संगनमत करून आर्थिक लोभाने मयत इसमाची जमिनीचा दस्त नोंदणी केल्याचे दिसून येते त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर करने, खोटी कागदपत्रे सादर केलेली असल्याचे माहीत असूनही आर्थिक हव्यासापोटी, जमिनीचा बोगस व्यक्ती उभा करून परस्पर नोंदणी करून मयताच्या वारसांना त्यांच्या हक्काच्या जमिनी पासून वंचीत ठेवण्यात आलं आहे.
या बाबत दुय्यम निबंध कार्यालय मधील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चीत करून गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे व पुढील काळामधे होणाऱ्या अशा गंभीर प्रकारांना आळा बसवावा. संबंधीत प्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फीची कारवाई करावी अशी अशी मागणी दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांनी केली आहे.
या उपोषणास पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा दैनिक तुफान क्रांती चे विभागीय संपादक यशवंत पवार गुलचंद भोरे अमजद मुजावर ज्येष्ठ पत्रकार संपादक अशोक ढोणे बसले आहेत.