सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
नवजीवन ग्रामविकास तरुण मंडळ संचलित स्वामी विवेकानंद प्रशालेत संस्थेचे अध्यक्ष श्री शिवशंकर अचलेरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य दिन संपन्न झाला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भगवती गौरीमाता शिक्षण संकुलाचे सेवानिवृत्त प्रा श्री स्वामीनाथ कलशेट्टी सर, संस्थेचे सचिव तथा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुभाष भिमणवरू सर, प्रशालेचे उपाध्यक्ष श्री सुरेश भिमणवरू, गावचे माजी सरपंच महारुद्र बडुरे, उपसरपंच विभिषण पाटील, इरण्णा भिमणवरू तंटामुक्त अध्यक्ष इरय्या स्वामी, प्रशालेचे सर्व संचालक, संचालिका, सदस्य, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका सेवक उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री स्वामीनाथ कलशेट्टी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला व प्रतिमा पूजन संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश भिमणवरू यांनी केले. सदर प्रसंगी मातोश्री कै.सौ. रत्नाबाई श्रीमंत भिमणवरु यांच्या स्मरणार्थ मा. श्री मा. अध्यक्ष श्री श्रीमंत मल्लप्पा भिमणवरू यांच्यावतीने इयत्ता दहावी मध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्यदिनानिमित्त इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व देशभक्तीपर नृत्य सादर केले याच वेळी कलशेट्टी सरांनी मातोश्री सुमंगला कलशेट्टी यांच्या स्मरणार्थ मनोगत मांडलेल्या विद्यार्थ्यांना व देशभक्तीपर नृत्यास एक हजार रुपयाचे रोख बक्षीस हे देऊ केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वामीनाथ कलशेट्टी सरांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष भिमणवरू सर सूत्रसंचालन विजयकुमार बाळगी सर तर आभाप्रदर्शन गुरुशांत गंगदे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे शिक्षक शिक्षिका सेवक आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमास बहुसंख्येने गावचे प्रतिष्ठित नागरिक, माजी विद्यार्थी उपस्थित होते .