पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भाळवणी च्या नूतन शाखाधिकारीपदी बालाजी हारके यांची नेमणूक झाली आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रणजीत जाधव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शेतकरी दूध संस्थेचे चेअरमन निहाल शेख,प्रशांत माळवदे,विवेक भोरे ,परेश वाळवाणी,अशोक गुरव,बापू वाघमारे उपस्थित होते.
यावेळी सरपंच रणजीत जाधव म्हणाले की येथील , परिसरातील बँकेचे ग्राहक आपणास सर्व ते सहकार्य करतील आणि बँक ग्राहकांचे सर्व प्रश्न चर्चेतून लवकरच मार्गी लागतील. याकरिता ग्रामपंचायतीचे सर्वते सहकार्य केले जाईल असेही जाधव म्हणाले.
यावेळी शाखाधिकारी हारके म्हणाले आजपर्यंत बँक ग्राहकांनी जे सहकार्य केले आहे.असेच सहकार्य राहू द्यावे.निश्चितपणानेच खातेदारांचे सर्व प्रश्न सोडवले जातील.