सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सिंहगड संस्थेचा ३१ वा 'वर्धापन दिन' सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
यावेळी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, इस्टेट ऑफिसर डॉ. दत्तात्रय नवले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे,डॉ. प्रदीप तपकीरे, डॉ. विजय बिरादार,डॉ. विनोद खरात उपस्थित होते.
यावेळी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सिंहगड संस्थेबद्दल व तसेच सिंहगड संस्थेमध्ये राबवली जाणारी कार्यप्रणाली याविषयी मार्गदर्शन माहिती सांगितली.
यावेळी डॉ. प्रदीप तपकीरे यांनी सिंहगड संस्थेचे व्हिजन व मिशन याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी इस्टेट ऑफिसर डॉ. दत्तात्रय नवले यांनी सिंहगड संस्थेचे स्थापना १२ ऑगस्ट १९९३ रोजी वेणूताई चव्हाण पॉलीटेकनिकल कॉलेज या लहान वटवृक्षापासून झालेली सुरवात ते आज पर्यंतच्या संस्थेच्या प्रवासाबद्दल व तसेच सिंहगडमध्ये कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणाऱ्या कार्यप्रणाली याविषयी माहिती सांगितली.
यावेळी सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सिंहगड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.एम. एन. नवले सर यांच्या व्हिजन आणि मिशन याविषयी माहिती सांगितली.सिंहगड संस्थेमध्ये ८ हजार कर्मचारी काम करतात व ९० हजार विद्यार्थी या संस्थेमधून शिक्षण घेत आहेत.या संस्थेचा विस्तार पुणे, मुंबई, सोलापूर असून यामध्ये एकूण १११ कोर्सेसचा शिकवले जातात.
तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.